• मुख्य पृष्ठ
  • माझ्याविषयी
  • लोकनेते
  • लातूर ग्रामीण
  • मीडिया
  • पुढाकार
    • रुग्णालयांची यादी
  • महत्त्वपूर्ण दुवे
  • संपर्क
    • माझ्याशी जोडले जा
    • अर्ज नोंदवा
    • अर्ज शोधा
    • संवाद साधा
...
अधिक माहिती

लातूर ग्रामीण

  1. मुख्य पृष्ठ
  2. लातूर ग्रामीण

लातूर ग्रामीण मतदार संघ

लातूर ग्रामीण मतदार संघाची रचना 2009 साली झाली. लातूरची वाढती लोकसंख्या पाहता लातूर मतदार संघाची रचना होणे क्रमप्राप्त होते. 2009 साली लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदार संघ अशी नव्याने रचना झाली. लातूर मतदार संघाचे लोक प्रतिनिधी या नात्याने लोकनेते विलासराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले होते.

नवीन रचनेनुसार लातूर शहर मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून वैजनाथराव शिंदे यांना 2009 साली काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली. तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून त्र्यंबकराव भिसे यांना लातूर ग्रामीण मधून उमेदवारी मिळाली व 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून धिरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत ते राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिले मतदारांचीएवढी प्रचंड साथ धिरज देशमुख यांना लाभली. लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत.मांजरा साखर, रेणा साखर व नव्याने सुरू झालेला ट्वेंटीवन शुगर हे साखर कारखाने ग्रामीण मतदारसंघात आहेत. तसेच कार्यान्वित होत असलेला मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी हा प्रकल्प देखील लातूर ग्रामीण मतदारसंघात समाविष्ट आहे.

लातूर ग्रामीण मधील मुरुड येथील बाजारपेठ लातूरच्या नंतर मोठी असलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

लातूर ग्रामीण मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार व अन्य दैनंदिन क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आपला मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला यावा यासाठी आ.धिरज विलासराव देशमुख प्रयत्नशील आहेत.

#TypeContact NameContactAddress
No records found

धिरज विलासराव देशमुख

आमदार , महाराष्ट्र विधानसभा , लातूर (ग्रामीण), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

निवास : मु. पोस्ट बाभळगाव, ता. जि. लातूर – महाराष्ट्र
संपर्क कार्यालय : B-44, एकमत भवन, लातूर - 413531, महाराष्ट्र

कॉल करा:  +91 9023599999

ई- मेल पाठवा:  connect@dhirajvilasraodeshmukh.com

सेवेची अट | गोपनीयता धोरण
कॉपीराइट  © २०२२ धिरज विलासराव देशमुख. सर्व हक्क राखीव
रचनाकार नेटिझन्स आय.टी.ई.एस.