धिरज विलासराव देशमुख

दूरदृष्टी असलेला एक तरूण, राजकारणी व समाजकारणी.......

उच्चविद्या विभूषित एक तरुण राजकारणी व समाजकारणी म्हणून ओळखले जाणारे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लंडन येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. लोकनेते श्रध्देय विलासरावजी देशमुख यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून २०१३ साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात प्रवेश केला.लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने काम करत असताना.तरुणांचे मोठे संघटन उभे करून काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे काम त्यांनी केले.त्यानंतर २०१७ साली लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक एकुर्गा ता. जि. लातूर या मतदार संघातून त्यांनी जिंकली. त्यानंतर २०१९ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघातून एक लाख २१ हजार एवढ्या विक्रमी मताधिक्‍याने त्यांनी विजय मिळवला.

एक तरुण आमदार या नात्याने आरोग्य, कृषी, क्रीडा, जलसिंचन,पर्यावरण,महिला सक्षमीकरण,सहकार,शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जनसामान्यांच्या सेवेसाठी ते कार्यरत आहेत.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आधारवड आहे. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या २०२१ मधील पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून आमदार धिरज विलासराव देशमुख बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्रातील पहिल्या पाच यशस्वी जिल्हा बँकेत गणल्या जाणाऱ्या.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष होण्याचा मान आ. धिरज विलासराव देशमुख यांना मिळाला आहे.आपल्या भागासाठी काही तरी चांगले करून दाखवण्याची त्यांची भावना व त्या दृष्टीने ते करत असलेले प्रयत्न मोलाचे ठरत आहेत.


२०१३

राजकारणातला प्रवास

एम.बी.ए.चे शिक्षण लंडन येथे घेऊन उद्योग, व्यवसायाकडे धिरज देशमुख वळतील असे वाटत असताना २०१३ साली धिरज यांचा लातूरच्या सक्रीय राजकारणात प्रवेश झाला. ते स्वत: युवक असल्याने त्यांनी युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन आपल्या राजकीय वाटचालीस सुरूवात केली. धिरज यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या विकासाचा वारसा धिरज कशा पध्दतीने चालवतील याची देखील उत्सुकता सर्वांना होती. राजकारण व समाजकारणात नेमके कोणते विचार घेऊन धिरज वाटचाल करतील याविषयी देखील सर्वांना कुतुहल होते. लहानपणापासुनच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धिरज यांच्यावर झालेले संस्कार त्यांना आपल्या राजकीय वाटचालीत कामी आले. त्यामुळेच अल्पावधितच धिरज यांच्याकडे उद्याचा नेता या दृष्टीकोनातुन पाहिले जाऊ लागले होते. सुरूवातीला कुठल्याही पदावर नसताना काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने काम करत असताना आज ते लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. यावरून धिरज विलासराव देशमुख यांच्या यशाची व वाटचालीची प्रचिती येते.

युवकांचे संघटन

भारत हा युवकांचा देश म्हणुन ओळखला जातो. आजचा युवक हा आपल्या देशाचे भविष्य आहे. देशासाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं करु पाहणाऱ्या युवकांना श्री.धिरज विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम सुरूवातीपासुनच हाती घेतले. यासाठी ठिक- ठिकाणच्या गावात बैठका घेऊन युवकांशी त्यांनी संवाद साधला. युवकांनी धिरज देशमुख यांच्या संकल्पनेस चांगला प्रतिसाद दिला. एक युवा नेता आपल्या अडचणी जाणून घेत आहे व आपल्यासाठी काहीतरी करु पाहत आहे याचे समाधान युवकांना मोठ्या प्रमाणात वाटत होते.

जेष्ठांशी संवाद

लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गावांमध्ये गेले असता धिरज विलासराव देशमुख यांनी युवकांसोबत जेष्ठांशी देखील संवाद साधला. लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या समवेत काम केलेल्या जेष्ठ व्यक्तींसोबत चर्चा करुन त्यांचे नेमके काय विचार आहेत काय सुचना आहेत हे धिरज विलासराव देशमुख यांनी जाणुन घेतले.

काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न

जनसेवेची ३५ वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाच्या विचाराचा पाईक असल्याचा अभिमान बाळगत धिरज विलासराव देशमुख यांनी असंख्य युवकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष संघटना वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. लातुर जिल्ह्यातील युवकांना काँग्रेस पक्षाशी मोठ्या प्रमाणात जोडुन सर्वसामान्य व्यक्तींना काँग्रेस पक्षाची ध्येय- धोरणे, विचार आणि विकास कामे पोहोंचवण्यासाठी धिरज देशमुख यांनी प्राधान्य दिले. वेळोवेळी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधुन विचारांची देवाण-घेवाण धिरज विलासराव देशमुख यांनी केली.

निवडणुक प्रचारसभा

लातुर जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने काम करत असताना धिरज विलासराव देशमुख यांच्या कामाची व प्रभावी भाषणशैलीची ओळख सर्वांना झाली. २०१४ लोकसभा निवडणुकीत सर्वाधीक सभा धिरज देशमुख यांनी घेतल्या होत्या. त्यामुळे साहजिकच सर्वांचे लक्ष धिरज यांच्याकडे वेधले गेले.
२०१४
२०१५

राजकीय जिवनातील पहिली निवडणुक

पक्षांतर्गत विविध पदावर निवडीसाठी काँग्रेस पक्षाने निवडणुका घेण्याचे ठरवले त्यानुसार लातूर जिल्हा युवक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी धिरज यांनी आपला फॉर्म भरला या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी धिरज यांचा विजय झाला होता. हि त्यांच्या राजकीय जिवनातील पहिली निवडणुक ठरली.

जिल्हा परिषद निवडणुक

धिरज विलासराव देशमुख यांच्या राजकीय जिवनातील वाटचालीच्या टप्यातील जिल्हा परिषद-२०१७ ची निवडणुक खुप महत्त्वाची व विशेष होती. लातूर तालुक्यातील एकुर्गा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडुन जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार उमेदवारी देण्यात आली. त्यांचा विजय सहज होता मात्र तरी त्यांनी प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांनी देखील धिरज देशमुख यांच्या प्रयत्नांना मतपेटीतुन साथ दिली. या निवडणुकीतील विजय धिरज यांच्यासाठी मोलाचा होता. लोकनेते विलासराव देशमुख यांनी गावपातळीवरुन जशी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली, त्याच पध्दतीने धिरज देशमुख यांनी देखील एकुर्गा जिल्हा परीषद गटातुन निवडून येऊन ग्रामिण भागाच्या सर्वांगीण विकासाला डोळ्यासमोर ठेवून कार्यास सुरूवात केली.
२०१७
२०१९

विधानसभा निवडणुक

लातुर ग्रामीण मतदार संघात धिरज विलासराव देशमुख यांचा जनसंपर्क व त्या माध्यमातून जनतेच्या मनात मिळवलेले स्थान पाहता विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये धिरज देशमुख हेच आपले उमेदवार असावेत अशी भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. विशेषत: तरुण वर्गाकडून धिरज यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न होत होते. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांकडे असंख्य युवकांनी निवेदन देऊन मागणी देखील केली होती. निवडून येण्याची खात्री असल्यानेच काँग्रेस पक्षाकडुन धिरज देशमुख यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली होती. आपण कितीही सक्षम असलो तरी कोणतीही निवडणुक सहजपणाने घ्यायची नाही या धारणेतुन धिरज यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या. यासाठी अभिनेते रितेश देशमुख यांची देखील खंबीर साथ त्यांना लाभली. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.अमितजी देशमुख यांच्या सहकार्याने धिरज विलासराव देशमुख यांनी लातुर ग्रामीण मतदार संघातुन भरमसाठ मते मिळवत राज्यात सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार या यादीत तिसरे स्थान मिळवले. त्यांनी आपला हा विजय लोकनेते विलासरावजी देशमुख यांना समर्पित केला.