लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या 77 व्या जयंती निमित्त उजाळा साहेबांच्या आठवणींना उजाळा
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त लातूरकरांच्या वतीने आयोजित 'उजाळा साहेबांच्या आठवणींना' या सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी ह्रदयाला स्पर्श करून जाणाऱ्या साहेबांच्या एकामागून एक आठवणी उलगडत गेल्या. त्या कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी उर अभिमानाने भरून येणाऱ्या, त्या कधी डोळ्याच्या कडा ओलावणाऱ्या तर कधी विचारचक्रात गुंतवून ठेवणाऱ्या ठरल्या. याची अनुभूती माझ्यासह अनेकांनी यावेळी घेतली. या सोहळ्यात सहकारमहर्षी व माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख जी, राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे जी, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे जी, ज्येष्ठ समाजवादी नेते श्री. मनोहर गोमारे जी, ज्येष्ठ संपादक व विधिज्ञ श्री. बी. व्ही. मोतीपवळे जी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ रोडे जी यांच्या समवेत मी सहभागी झालो. यानिमित्ताने मलाही लातूरकरांशी मनमोकळा संवाद साधता आला. - माझा राजकीय प्रवास साहेब आपल्यातून गेल्यानंतर सुरू झाला. त्यामुळे मला त्यांचा 'राजकीय सहवास&